भुसावळचे २६ भाविक ठार; नेपाळमध्ये बस पाचशे फूट खोल दरीत कोसळली
१४ जण जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
जळगाव |
भूसावळ (जि.जळगाव) तालुक्यातून नेपाळमधील पशुपतिनाथ
येथे दर्शनासाठी गेलेल्या भाविकांची चस नदीत कोसळून २६ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, १४ जण जखमी झाले. नेपाळची राजधानी काठमांडूपासून १२० किलोमीटरवर ही दुर्घटना घडली. तनहून जिल्ह्याच्या अंबूखैरेनी भागात शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास पृथ्वी महामार्गावर हा अपघात घडला. चालकाचा ताचा सुटल्याने वस पाचशे फूट खोल दरीत कोसाहून शेवटी ती मास्यांगडी नदीत पडली. त्यानंतर नेपाळ सरकारने सूत्रे हलवित बचावकार्य सुरू केले. बसमध्ये वाहनचालक आणि क्लीनरसह ४० जण होते. जखमींवर काठमांडूसह तनहून जिल्ह्यातील रुग्णालयांत उपचार सुरू असल्याचे भारतीय दूतावासाने कळविले आहे. मृतांची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरूच होते. काही भाविक गंभीर जखमी झाले असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
सुसरी, पिंपळगाव खुर्द, गोळेगाव, तळवेल, आचेगाव आदी गावांतील ८२ भाविक १६ ऑगस्ट रोजी रेल्वेने अयोध्यातील रामकथा श्रवण करण्यासह प्रयागराज येथे गेले होते. अयोध्या व प्रयागराज येथे दर्शन घेतल्यानंतर सर्व भाविक गोरखपूरच्या केसरवाणी दूर अॅण्ड ट्रॅव्हल्स एगनीच्या दोन बसने नेपाळकडे गेले. दोन दिवसांपूर्वीच ते नेपाळमध्ये दाखल झाले होते. मृत वाहनचालक मुर्तजा हा गोरखपूरचा रहिवासी आहे. दुर्घटनेचे वृत कळताच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, भुसावळचे आमदार संजय सावकारे तातडीने अपघातस्थळाकडे रवाना झाले.
-असा झाला अपघात
•२२ ऑगस्ट रोजी दोन बसेस पोखरा येथे पोहोचल्या
•शुक्रवारी भाविक पशुपतिनाथ येथे जाण्यासाठी पोखराहून
•काठमांडूच्या दिशेने सकाळी निघाले
• रीना धबधबा एक किलोमीटर अंतरावर असताना ४० भाविक असलेल्या बसवरील (यूपी ५३ एफटी ७६२३) चालकाचे
नियंत्रण सुटले
•पृथ्वी महामार्गावरून बस ५०० फूट खोल दरीतून मास्यांगडी
नदीत कोसळली
•सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला
२६ भाविकांचा मृत्यू, तर १४ जण जखमी
•वरणगावातील सुमारे १० जणांचा या अपघातात मृत्यू
• बचावकार्यातील पथकाने २६ मृतदेह बाहेर काढले असून, जखमींना उपचारासाठी काठमांडूला हलवले आहे.
मृत भाविकांची नावे
सरला भारंबे (वय ६०), भारती प्रकाश जावळे (६२), सरला तायडे (६२), अनुप सरोदे (२२), विजया जावळे (६५), सरला राणे (४५), परी भारंबे (८), पंकज भंगाळे (४५), संदीप सरोदे (४५), नीलिमा धांडे (५७), तुळशीराम तायडे (६२), गणेश भारंबे (४०), पल्लची सरोदे (४३), अनिता पाटील, रोहिणी जावळे, सुभाष र (४५), धांडे (पूर्ण नाव माहीत नाही), काही भाविकांची नावे रात्री उशिरापर्यंत काळ शकली नाही.
भारतातील अधिकाऱ्यांची धाव
घटनेची माहिती कळताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भारतीय दूतावासाशी संपर्क केला, तसेच नेपाळच्या सीमेवर असलेल्या महाराजगंज (उत्तर प्रदेश) जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. महाराजगंजमधील उपजिल्हाधिकारी व पोलिस उपअधीक्षक घटनास्थळी पोहोचले.