चाळीसगाव शहरातील अतिक्रमण काढण्यात संदर्भात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे घंटानात आंदोलन
चाळीसगाव |
शासकीय मोजणी झाल्यानंतर सर्व दुकानांचे अतिक्रमण काढले जाईल, अतिक्रमणाच्या संदर्भात कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे स्पष्ट आश्वासन चाळीसगांव नगर पालिकेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी पत्रकारांना दिले असतांना परंतु शहरात अजून काही दुकानदारांचे अतिक्रमण जसेच्या तसे आहे. या अतिक्रमणामुळे रस्त्यावर वाहतुकीला प्रचंड अडथळे निर्माण झालेले आहेत, सदर अतिक्रमण काढण्यात यावे या मागणीसाठी गेल्या महिन्यात शहरातील पत्रकारांनी चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन समोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले होते. त्या आंदोलनानंतरही सदरचे अतिक्रमण काढले गेले नाही म्हणून काल दि.२२ रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात चाळीसगांव नगर पालिके विरोधात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ चाळीसगांव शाखेच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. त्यानंतर नगरपालिकेच्या आवारात घोषणाबाजी करत तिथेही आंदोलन करण्यात आले. आंदोलन दरम्यान नपाचे मुख्याधिकारी सौरभ जोशी व बांधकाम विभागाचे दिनेश जाधव हे आंदोलन स्थळी आले असता मुख्यधिकारी सौरभ जोशी यांनी सांगितले की अतिक्रमण काढण्यासंदर्भातल्या ज्या काही कायदेशीर बाबी आहेत त्या पुर्तता करण्याच्या दिशेने आमचे प्रयत्न सुरू आहेत. खंडेलवाल सुटकेस सेंटरचे अतिक्रमण आहे की नाही हे भुमी अभिलेख यांच्याकडून मोजणी झाल्या नंतरच स्पष्ट होईल. मोजणी झाल्यानंतर हे अतिक्रमण कोणत्याही परिस्थीतीत काढले जाईल कोणाच्याही अतिक्रमणाला पाठीशी घातले जाणार नाही असे त्यांनी सांगितले. मुख्यधिकारी यांनी आश्वासन दिल्यानंतर पत्रकारांनी आपले आंदोलन तात्पुरता स्थगित केले.