जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

मद्यपान करून धिंगाणा : मुक्ताईनगरच्या कॉन्स्टेबलचे निलंबन पोलीस अधीक्षकांचे आदेश

जळगाव |
जळगावात रविवारी बंदोबस्ताला जिल्हाभरातून पोलीस दल दाखल झाले होते. यात मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये नेमणूक असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल संदीप धनगर हे रविवारी दुपारी भास्कर मार्केट परिसरातील एका बारमध्ये आले. यावेळी संदीप धनगर यांना मद्यपान जास्त झाल्याने त्यांना आवरण्यासाठी आणखी दोघे मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचेच २ पोलीस कर्मचारी आले.
त्यांनी संदीप धनगर यांना सावरण्याचा प्रयत्न केला. संध्याकाळी साडेपाच ते पावणे सहावाजेदरम्यान सदर घटना घडली. नंतर कारमध्ये (क्र. एमएच ०२, ईएच १०४८) बसून संदीप धनगर यांनी कशीबशी कार काढली आणि रस्त्याला लागल्यानंतर समोर एका सायकलस्वार मुलाला धडक दिली. मात्र तरीदेखील कार न थांबविता कारचालक भरधाव वेगाने पसार झाला. यामध्ये सुदैवाने मुलाला काही दुखापत झाली नाही. हा सर्व प्रकार बारसह आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.आदेश सोमवारी दि. २६ रोजी संध्याकाळी देऊन पुढील चौकशी करण्याचे संबंधित विभागाला निर्देशित केले आहे. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे यापूर्वीहि पीएसआयसह ५ जण गुटख्याचे वाहनावर कारवाई न करता सोडून दिले म्हणून निलंबित केले आहेत.
दरम्यान, या घटनेत चौकशी झाल्यानंतर संपूर्ण घटना निष्पन्न झाली आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दखल घेऊन मुक्ताईनगरचे कॉन्स्टेबल संदीप धनगर यांना गणवेशात मद्यपान करून सार्वजनिक जागी गैरवर्तन केल्याबाबत निलंबित केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button