भाकपतर्फे जातीगत जनगणना परिषद
जातीनिहाय जनगणना मागास जनतेच्या विकासासाठी आवश्यक
चोपडा |
भारतात १९५१ ला जनगणना केली असता फक्त अनुसूचित जाती, जमातीविषयक माहिती जाहीर करण्यात आली. २०१४ पासून सरकारने मात्र जातीगत जनगणना ही जातीला प्रोत्साहित करणारी आहे, असा दावा करून विरोध चालविला आहे. खरे म्हणजे १९३१ नंतर भारतात जातीगत जनगणना झालीच नाही. जातीगत जनगणना ही ब्रिटिशांची देणगी आहे. स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या सत्ताधाऱ्यांनी जातीगत जनगणना करणे टाळले. ज्या काही जनगणना झाल्या त्या फक्त एससी, एसटी याची आकडेवारी बाहेर काढली. दुसरीकडे संविधानानुसार सर्व थरातील मागास जातीचा आर्थिक, सामाजिक विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे हे अधोरेखित आहे. त्यामुळे जातीनिहाय जनगणना मागास जनतेच्या विकासासाठी आवश्यकच असल्याचे प्रतिपादन जळगाव येथील साहित्यिक, विचारवंत जवसिंग वाध यांनी केले. चोपडा येथे धनगर वाडा समाज मंदिरामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आयोजित जातीगत जनगणना परिषदेत
ते बोलत होते. अध्यक्षस्थानी परिषदेचे निमंत्रक कॉम्रेड अमृत महाजन होते. परिषदेचे उदघाटन डॉ. नरेंद्र शिरसाट यांनी केले.
जातीगत जनगणना परिषदेत डॉ. नरेंद्र शिरसाट, कॉ. अमृत महाजन, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष के. डी. चौधरी, जिल्हा अंधश्रद्धा निवारण समितीचे नेते डॉ. अयुब पिंजारी यांनी मार्गदर्शन करुन मनोगत व्यक्त केले. ‘जातीनिहाय जनगणना’ विषयावर कोल्हापूर येथे भाकपच्या पुढाकाराने राज्य परिषद होत आहे. त्यात सहभागी व्हावे आणि तसेच येत्या काही दिवसात या दिवशी कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्यभर आंदोलने केली जाणार आहेत, अशी माहिती कॉ. महाजन यांनी दिली. आंदोलन राज्य परिषद वात जिल्ह्याने सहभाग द्यावा, असे आवाहन केले.
‘सप्टेंबरला परिसंवाद
जळगाव येथे ‘जातनिहाय जनगणना’ विषवावर २ सप्टेंबर रोजी परिसंवाद घेणार असल्याचे कॉ. महाजन यांनी सांगितले. नेपाळमध्ये पशुपती नाथ दर्शनाला जाणान्या जळगाव जिल्ह्यातील २५ भाविक प्रवासी मृत पावले. त्या भाविकांना परिषदेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यशस्वीतेसाठी कॉ. गोरख वानखेडे, सादिक टेलर, माजी नगरसेवक सुरेश शिरसाट, माजी नगरसेवक गुलाब कुरेशी, सुरेश धनगर, अरुण धनगर, शेख अतिक शेख हुसेन आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. रुस्तुम तडवी, स्वागत पुंडलिक महाजन, परिचय संजीव शिरसाठ, सूत्रसंचालन शांताराम पाटील तर आभार डी. पी. साळुंखे यांनी केले.