एमपीएससी पूर्व परीक्षेबाबत मोठी अपडेट…
मुंबई |
आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये विद्यार्थ्यांचा रोष ओढवून घेणे टाळण्यासाठी राजकीय पक्षांकडून आलेल्या दबावामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अखेर २५ ऑगस्टची राज्यसेवा पूर्व परीक्षा चौथ्यांदा रद्द केली होती.
एमपीएससीची राज्यसेवा परीक्षेची संपूर्ण तयारी झाली आहे. सर्व प्रश्नपत्रिका केंद्रावर पोहचल्या असून त्यांना कधीही परीक्षा घेणे शक्य आहे. तरी आगामी विधानसभेच्या निवडणुकांचा फटका परीक्षेला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय निवडणुकांदरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो,आता राज्यसेवा परीक्षा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यासाठी निवडणुकांच्या तारखांचा अंदाज घेऊनच आयोग परीक्षेची तारीख जाहीर करण्याची शक्यता आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये विद्यार्थ्यांचा रोष ओढवून घेणे टाळण्यासाठी राजकीय पक्षांकडून आलेल्या दबावामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शेवटी २५ ऑगस्टची राज्यसेवा पूर्व परीक्षा चौथ्यांदा रद्द केली होती.