९१२८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली सेट परीक्षा
पुणे |
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी प्रवेश परीक्षा शनिवारी झाली. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पुणे, नगर, नाशिक येथील १८ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. एकूण ४० विषयांसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी एकूण दहा हजार ७०० विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यापैकी नऊ हजार १२८ विद्यार्थ्यांनी सदर परीक्षा दिली. परीक्षेदरम्यान शहरात एका परीक्षा केंद्रावर सुरुवातीला तांत्रिक बिघाडामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यापीठाने तांत्रिक बिघाड तातडीने दुरुस्त केल्यानंतर अवघ्या काही वेळाने परीक्षा सुरळीत पार पडली.
पीएच.डी. प्रवेश परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया १० जुलैपासून सुरू झाली,त्यानंतर २४ ऑगस्ट रोजी परीक्षेचे आयोजन केले होते. दरम्यान, महाराष्ट्र बंद ही चर्चा सुरू होती. त्यामुळे या काळात परीक्षार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास विलंब तसेच अडथळा येऊ शकतो, या कारणास्तव ही परीक्षा ३१ ऑगस्टला घेण्याचा निर्णय विद्यापीठाने जाहीर केला. त्यानुसार प्रवेश परीक्षा पार पडली.