क्राईमजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

जळगाव जिल्ह्याचे माजी पोलिस अधीक्षक संतोष रस्तोगींच्या मुलीचा मृत्यू

लखनऊ |
जळगाव जिल्ह्याचे माजी पोलीस अधीक्षक आणि सध्या राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) नवी दिल्ली येथील महानिरीक्षक असलेले वरिष्ठ आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी यांची मुलगी, (१९) वर्षीय अनिका रस्तोगी, हिचा मृतदेह लखनऊच्या डॉ. राम मनोहर लोहिया विधी विद्यापीठातील वसतिगृहाच्या खोलीत सापडला आहे.
माहितीनुसार, अनिका शनिवार, ३१ ऑगस्ट रोजी रात्री आपल्या खोलीत गेली होती. काही वेळानंतर तिची रूममेट आली, पण अनिकाने दरवाजा उघडला नाही.,इतर विद्यार्थिनींनी देखील आवाज दिला, पण कोणताही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही.
यानंतर, वॉर्डनच्या सांगण्यानुसार, दरवाजा तोडला असता, अनिका आत बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिला तत्काळ रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अनिका वरिष्ठ आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी यांची मुलगी होती.
आशियाना पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button