खेलो इंडियाच्या माध्यमातून खेळाडूना राज्य आणि राष्ट्रिय व्यासपीठ प्राप्त झाले – माजी आमदार चंद्रकांत सोनवणे
जळगाव | ग्रामीण भागातील आणि प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करणाऱ्या, वाड्या तांड्यावर शाळेत जाणारे प्रतिभाशाली ९ ते १८ वयोगटातील विद्यार्थी यांना खेळातील त्यांचे कौशल्य अधिक विकसित व्हावे त्यांना खेलो इंडिया KIRTI (Khelo India Rising Talent Identification) मूल्यांकन शिबिराचे आयोजन करून आगामी ओलांपिक स्पर्धेत अथवा इतर स्पर्धेत सहभाग घेता यावा आणि त्यांना सक्षम मंच मिळावा यासाठी जिल्ह्यात खेलो इंडिया सेंटर सुरू झाले आहे असे केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री, माननीय श्रीमती रक्षा खडसे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर जळगांवचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, प्रादेशिक संचालक स्पोर्ट एथोरिटी ऑफ इंडिया पांडुरंग चाटे, के.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, आ. सुरेश भोळे, उज्वला बेंडाळे, माजी आ. चंद्रकांत सोनवणे, डॉ. केतकी पाटील, प्राचार्य डॉ. स. ना. भारंबे, सहाय्यक जिल्हाधिकारी वेवोतोलु केज़ो आणि के. सी. ई सोसायटीचे संचालक डी. टी. पाटील, प्रविणकुमार जंगले, भरत अमळकर, संजय प्रभूदेसाई, प्राचार्य अशोक राणे, हर्षवर्धन जावळे उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्रीमती खडसे यांनी प्रत्येक जिल्ह्यात खेलो इंडियाच्या माध्यमातून चांगले खेळाडू घडावे यासाठी सतत प्रयत्न करणार आहोत. त्यासोबत जळगाव जिल्ह्यातील उद्योगपती यांनी सीएसआर फंडातून गरजू खेळाडूना प्रशिक्षण आणि इतर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे सांगितले. कार्यक्रमाच्या सुरवातीला एकलव्य क्रीडा संकुलच्या विद्यार्थ्यानी मल्ल खांब प्रात्यक्षिक करून दाखवले. कान्ह ललित कला केंद्राच्या संगीत विभागाने स्वागत गीत सादर केले. अखिलेश शर्मा यांनी मंगलाचरण सादर केले. के. सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी आपल्या प्रस्तावनेत खेलो इंडिया KIRTI (Khelo India Rising Talent Identification) मूल्यांकन शिबिराचे आयोजन मूळजी जेठा महाविद्यालयाचे एकलव्य क्रीडा संकुलात आयोजन केले याबद्दल आभार व्यक्त केले.
एकलव्य क्रीडा संकुलात विविध खेळाचे आयोजन केले जाते. त्यासह विविध स्पर्धा आयोजन करत असतो यासाठी के. सी.ई. सोसायटीत प्रशस्त मैदान, जिमखाना सुविधा उपलब्ध आहेत आणि विद्यार्थ्यानी खेळांमध्ये सहभाग घ्यावा यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. खान्देशातील विद्यार्थ्याना विविध खेळ प्रकारात पारंगत होता यावे म्हणून एकलव्य क्रीडा संकुलाची निर्मिती झाली आहे. या मध्ये विविध खेळांचे प्रकार शिकविले जातात. यातूनच अनेक विद्यार्थी राष्ट्रीय, राज्य व जिल्हास्तराव आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. यावेळी माजी आ. चंद्रकांत सोनवणे यांनी क्रीडा क्षेत्रातील अडचणी आणि त्यासाठी मदत व्हावी असे मत मांडले.