“भिडेवाडा”कविसंमेलन उत्साहात संपन्न
जळगाव |
आयएमआर काॅलेजच्या सभागृहात दि. १ स्पटेंबर २०२४ रोजी “भिडेवाडा” संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी कवी विजय वडवेराव हे होते.
जिल्ह्यातील आणि तालुक्यातील जामनेर, पाळधी, साक्री, पाचोरा, चोपडा, रावेर व गाढोदा अशा लहान लहान खेडेपाड्यातील मिळून तब्बल १०० कवी कवयित्री कविसंमेलनासाठी सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलतांना कवी विजय वडवेराव यांनी सांगितले की २०१४ मध्ये “मी बोलताच त्यानं हंबरडा फोडला” ही कविता प्रत्यक्ष भिडे वाड्यात मातीच्या ढीगाऱ्यावर बसून लिहीली. त्यानंतर एक कविसंमेलन घेतले. भिडेवाड्याचे कार्य हाती घेत भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन केले.या नंतर ७ जुलै २०२४ रोजी पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड येथे आंतर राष्ट्रीय काव्य महोत्सवाचे त्यांनी आयोजन केल्याचे सांगितले तसेच त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की मी पुर्ण ३६ जिल्हे पिंजून काढेल, भिडेवाडा जपला पाहिजे, देशातील मुलींच्या पहिल्या शाळेचा इतिहास जतन झाला पाहिजे, त्याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे असेही त्यांनी मत व्यक्त केले.
भिडेवाडा देशातील मुलींची पहिली शाळा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यातील पहिले जिल्हास्तरीय काव्यसंमेलन जळगाव जिल्ह्याने केले. कार्यक्रम प्रसंगी शिक्षिका कवयित्री आणि त्यांची छोटी मुलगी या दोन्ही मायलेकींनी विचारमंचावर लाठी काठी तसेच दांडपट्टा चालवण्याचे प्रात्यक्षिक सादर करुन सभागृह दणाणून सोडले.
आद्य क्रांती लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. ईश्वर वाघ यांनी सर्व वाद्य वृंदासहित भिडे वाड्यावरील स्वरचित पोवाडा सादर केला.
जामनेर येथील महात्मा ज्योतीराव फुले शाळेच्या जवळपास २५ विद्यार्थींनीनी सावित्रीमाईच्या वेशात येऊन आपल्या कविता सादर केल्यात.
जवळपास १०० कविंनी आपल्या कवितेतून भिडेवाडा जिवंत केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी सुधीर महाजन यांनी केले. सुत्रसंचालन कवी श्री. अशोक पारधे,ज्योती राणे,ज्योती वाघ यांनी केले तर आभार प्रदर्शन आशा साळुंखे मॅडम यांनी केले.