स्वप्निल महाजन आणि नेहा कंगटे यांची दक्षिण आशियाई आंतरराष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड
जळगाव |
भारतीय आट्यापाट्या महामंडळाच्या वतीने भूतान येथे होणाऱ्या आठव्या दक्षिण आशियाई आंतरराष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून भारतीय संघात जळगाव जिल्हा आट्यापाट्या संघटनेचे स्वप्निल कैलास महाजन व नेहा भूपेंद्रनाथ कंगटे यांची निवड झालेली आहे.
त्यांची ही निवड सीनियर गट राष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धा चेन्नई व फेडरेशन चषक वरिष्ठ गट राष्ट्रीय आटयापाट्या स्पर्धा कोझिकोडे केरळ येथे झालेल्या स्पर्धेतील कामगिरीवरून करण्यात आलेली आहे.
त्यांच्या या निवड प्रित्यर्थ जळगाव जिल्हा आट्यापाट्या संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार अण्णासाहेब प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री रविंद्र नाईक साहेब, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त डॉ. प्रदीप तळवेलकर महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळाचे अध्यक्ष श्री बबनराव तायवाडे भारतीय आटयापाट्या महामंडळाचे सचिव डॉ. दीपक कवीश्वर सर महाराष्ट्र राज्य आटयापाट्या महामंडळाचे सचिव डॉ. अमरकांत चकोले सिद्धिविनायक फाउंडेशनच्या संचालिका डॉ.अमृताताई सोनवणे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त श्री. किशोर चौधरी, श्री. विशाल फिरके, श्री. आर. पी. खोडपे सर (मुख्याध्यापक सिद्धिविनायक विद्यालय) यांनी केले असून स्पर्धेतील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. स्वप्निल महाजन तेरा राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून सात राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्र संघा कडून प्रतिनिधित्व करताना महाराष्ट्र संघाच्या कर्णधार पदाची धुरा ही त्याने सांभाळली आहे.
दोघेही सिद्धिविनायक विद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्यामुळे विद्यालयातील शिक्षक वृंद व पालक वर्गाकडूनही त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.