जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र
सिद्धिविनायक विद्यालयात आनंद व उत्साहपूर्ण वातावरणात गणरायाचे आगमन*
जळगाव |
येथील जुन्या औद्योगिक वसाहत मधील सिद्धिविनायक बालवर्ग, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व इंग्रजी माध्यमिक विद्यालयात गणरायांचे ढोल ताशांच्या गजरात व गुलालाची उधळण करत आयोध्या नगर परिसरातून वाजत गाजत विद्यालयात आगमन झाले.
याप्रसंगी शिवनेरी आर्थोपेडिक हॉस्पिटलचे संचालक शंतनु भारद्वाज आणि डॉ.अमृता सोनवणे यांच्या हस्ते गणेशाची विधिवत स्थापना करण्यात आली. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.पी. खोडपे, गुलाब पाटील,अनिल चव्हाण, सुनील डांगरे, राजेंद्र पाटील, विजय पाटील, दिनकर चौधरी, प्रदीप सुरवाडे, बी.सी.पाटील,सत्यजित वाघ, ज्ञानेश्वर पाटील, किरण पाटील, प्रांजली पाटील, भारती तायडे,नेहा काळबैले, मोहिनी कोळी,मनीषा कालबैले, तसेच सर्वं माध्यमाचे शिक्षकवृंद आणि विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.