भोरटेक, कासावा शाळेतून अंतर्नादच्या ‘एक दुर्वा समर्पणाच्या’ उपक्रमास सुरुवात.
भुसावळ |
अंतर्नादने सामाजिक भान जपून एक दुर्वा समर्पणाची हा उपक्रम हाती घेतला आहे.यंदा उपक्रमाचे आठवे वर्ष आहे. त्यात समाजातील जास्तीत जास्त घटकांनी सहभागी हाेऊन गरजू विदयार्थ्याना मदतीचा हात देणे अपेक्षित आहे. उपेक्षित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी असे उपक्रम निश्चितच पुरक ठरतील. अंतर्नाद प्रतिष्ठान राबवत असलेला ‘एक दुर्वा समर्पणाची उपक्रम समाजासाठी आदर्शवत उपक्रम आहे असा सुर यावल तालुक्यातील भोरटेक आणि कासावा शाळेत मान्यवरांनी व्यक्त केला.
अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे गणेशाेत्सवात ‘एक दुर्वा समर्पणाची’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यात शनिवारी यावल तालुक्यातील भोरटेक आणि कासवा येथील जिल्हा परिषद शाळे मधे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. वाचन ही जीवन समृद्ध करणारी कला आहे. ती विद्यार्थी दशेत आत्मसात करणे सुलभ हाेते. भोरटेक येथे प्रमुख पाहुणे म्हणून शा.शि.स.अध्यक्ष सरला कोळी, मुख्याध्यापक नितीन राणे, तर कासवा जि.प.शाळा येथे शा.व्य.समिती अध्यक्ष सोनाली सपकाळे, उपाध्यक्ष कैलास बादशहा, ग्रामपंचायत सदस्य श्रीराम सपकाळे, मुख्याध्यापिका भावना इंगळे यांची उपस्थिती होते. प्रकल्पप्रमुख ज्ञानेश्वर घुले यांनी प्रास्ताविक केले, अंतर्नाद विषयी अमितकुमार पाटील यांनी माहिती दिली तर आभार सह समन्वयक चंद्रकांत सूर्यवंशी यांनी मानले.
११३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवीच्या ११३ विद्यार्थ्यांना पाट्या, सचित्र बालमित्र, वह्या, मोठे रजिस्टर, पेन्सील, पाटी पेंसील, पेन, कलर पेटी, पट्टी, खोडरबर असे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
उपशिक्षक उमेश फिरके, अर्चना तेल्लोरे,सुलभा लिधुरे, गोपाळ पवार यांच्यासह ग.स.संचालक योगेश इंगळे, प्रदीप सोनवणे, कुंदन वायकोळे, विक्रांत चौधरी, शैलेंद्र महाजन, अमित चौधरी जीवन महाजन, तेजेंद्र महाजन, विपीन वारके,समाधान जाधव अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांचे सहकार्य लाभले.
अंतर्नादने सामाजिक भान जपून एक दुर्वा समर्पणाची हा उपक्रम हाती घेतला आहे.समाजातील गरीब, गरजू आणि गुणवंत विदयार्थ्याना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचा हा एक छोटासा प्रयत्न आम्ही करत आहोत.समजातील अनेक दात्यांच्या सकारात्मक सहभागामुळेच या विदयार्थ्याना आम्हाला मदतीचा हात देता येतो असे प्रकल्प प्रमुख ज्ञानेश्वर घुले यांनी नमूद केले.