अंतर्नाद प्रतिष्ठानचे उपक्रम समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचणारे : हितेंद्र नेमाडे चेअरमन, नूतन विद्या मंदिर, अंजाळे
गणेशोत्सवाच्या खर्चात बचत करून अंतर्नादने दिला ६१ विद्यार्थ्यांना मदतीचा हात
भुसावळ |
“सण उत्सवांना सामाजीक उपक्रमांची जोड देउन राबविण्यात आलेला हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आणि समाजाला दिशा देणारा असाच आहे. दात्यांच्या मदतीच्या माध्यमातून गरीब, गरजवंत विद्यार्थी यांची शैक्षणिक साहित्याची गरज भागत आहे. समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत हि मदत पोहचत आहे. माझ्या परीक्षेची फी एका शिक्षकांनी भरली नसती तर माझं भविष्य घडलं नसत. या छोट्याश्या मदतीतून ऊर्जा घेऊन भविष्यात यांच्यातूनही कुणी मोठा अधिकारी घडेल आणि या उपक्रमाच्या दातृत्वाचा वारकरी होईल”, अश्या भावना विद्याप्रसारक मंडळ अंजाळे संचलित नूतन विद्या मंदिरचे चेअरमन हितेंद्र नेमाडे यांनी व्यक्त केल्या.
शहरात सालाबादाप्रमाणे अंतर्नाद प्रतिष्ठानने गणरायाला एक दुर्वा समर्पणाची उपक्रम यावल तालुक्यातील विद्याप्रसारक मंडळ अंजाळे संचलित नूतन विद्या मंदिरच्या शाळेत राबविला त्या प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अंजाळ्याच्या सरपंच नलीनी सपकाळे, उपसरपंच धनराज सपकाळे, शाळा सदस्य दिलीपभाऊ पाटील, मदनभाऊ सपकाळे, वि.सो.चेअरमन दीपक चौधरी, दूध डेअरी चेअरमन विजय चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प समन्वयक अमितकुमार पाटील यांनी तर आभार चंद्रकांत सूर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन राहुल भारंबे यांनी केले.
गणेशोत्सवात दरवर्षी ५ शाळेत हा उपक्रम घेतला जातो. यंदा उपक्रमाचे आठवे वर्ष आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून चित्रकलेच्या परीक्षेला बसलेल्या ६१ विद्यार्थ्यांना चित्रकलेचे उच्च दर्जाचे साहित्य देण्यात आले.
या प्रसंगी ग.स.सदस्य योगेश इंगळे, प्रदीप सोनवणे, संजय भटकर, जीवन महाजन, कुंदन वायकोळे, शैलेंद्र महाजन, तेजेंद्र महाजन, समाधान जाधव, देव सरकटे, प्रा. श्याम दुसाने, उमेश फिरके, विपीन वारके, अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील, आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.