ताज्या बातम्या
धर्मरथ फाउंडेशन आणि पिरामल फाउंडेशन च्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन.
जळगाव –
धर्मरथ फाउंडेशन आणि पिरामल फाउंडेशन च्या वतीने दिनांक 19/7/2024 शुक्रवारी रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या आरोग्य शिबिरात मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार व इतर सर्व आजारांची मोफत तपासणी करण्यात आली. शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जवळपास शंभरावर लोकांनी शिबिराचा लाभ घेतला.
याप्रसंगी विनायक पाटील अध्यक्ष धर्मरथ फाउंडेशन यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.