मनमोहक श्रीरामरुपी कांचन नगरचा विघ्नहर्ता.
बाप्पाची मुर्ती ठरतेय आकर्षाणाचा केंद्रबिंदु.
जळगांव | हर्षल सोनार
कांचन नगरात प्रशांत चौकातील श्रीराम युवा सांस्कृतिक मित्र मंडळाचा विघ्नहर्ता प्रभु श्रीराम रुपात अवतरलाय आहे.
बाप्पाची चर्तुभुज मुर्ती हनुमानाच्या गधेवर विराजमान असुन हातातील धनुष्यबाण जणु समाजातील वाईट प्रवृत्ती संपवण्यासाठी प्रत्यक्ष अवतरित झाल्याचा भास होतो. बाप्पाची ही मनमोहक मुर्ती परिसरात आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरतेय.
मंडळात गणेशोत्सवानिमित्त विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमातुन परिसरातील कलाकारांना हक्काचे व्यासपिठ उपलब्ध करुन दिले आहे.याशिवाय लहान बालगोपालांचा कलागुणांना देखील वाव देण्याच काम मंडळातर्फे होतंय.त्याच प्रमाणे स्री शक्तीचा जागर म्हणुन परिसरातील महीलांच्या हस्ते गणपतीची महाआरती नुकतीच मंडळातर्फे संपन्न झाली.मंडळाचे यंदाचे ९वे वर्ष असुन सालाबादाप्रमाणे मंडळ याही वर्षी विविध सामाजिक उपक्रमातुन समाजाच उद्बोधन,सामाजिक सलोखा निर्माण करण्याच काम मंडळातर्फे केलं जात आहे असे प्रतिपादन मंडळाच्याचे अध्यक्ष सुनील जाधव आणि
उपाध्यक्ष हर्षल सोनवणे यांनी प्रतिनिधीशी बोलतांना मत व्यक्त केले.