जीवन हे ‘असंस्कृत’ असून त्याला ‘सुसंस्कृत’ करा – परमपूज्य सुमितमुनिजी महाराज
जळगांव |
जीवनाची दोर जर तुटली तर त्याला पुन्हा जोडता येऊ शकत नाही. ते ‘असंस्कृत’ आहे ते क्षण मात्र सुद्धा प्रमाणित नाही. कुठल्याही पदार्थाचे ‘नित्य’ आणि ‘अनित्य’ असे प्रकार पडतात. भूत, वर्तमान, भविष्य काळात जे सदैव सोबत राहणार आहे; त्याला नित्य म्हणावे. तिन्ही काळात आत्मा सोबत असतो त्यामुळे तो नित्य ठरतो. तर जे स्थिर नाही आस्थायी आहे जे सर्व काळासाठी नाही, त्याला अनित्य म्हणावे. यात मनुष्याचे शरीर येते. त्यामुळे नित्य दृष्टी आपण ठेवली पाहिजे, तसे आचरण केले पाहिजे. शरीर भिन्न असते मात्र आत्मा हा एकच असतो तो शरीर बदलवू शकतो. त्यामुळे आपण अनित्य पदार्थांच्या मागे न धावता नित्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, तसे चिंतन केले पाहिजे. प्रत्यक्ष क्षण हा मृत्यू आहे, असे समजून अनित्याचा भार स्विकारला पाहिजे, तेच जीवनातील दुःखावरचे समाधान आहे. स्वास्थ्य, संपत्ती, सौदर्य यामागे मनुष्य धावत आहे, ते सुद्धा अस्थिर अनित्य आहे.
वैभव, संपत्ती, प्रतिष्ठा ही पूर्वाश्रमीच्या पुण्यामुळे मिळते. धर्माचारणामुळे पुण्य मिळते. कितीही पैसा, संपत्ती, प्रतिष्ठा असो मात्र धर्माचे आचरण नसेल तर ते काही ही कामाचे नाही. पुण्यवानी संपल्यानंतर करोडपती सुद्धा रोडपती झाल्याची अनेक उदाहरणे समाजात आहेत. आपल्या शुभ व अशुभ कर्मामुळे वर्तमानासह भविष्यकाळात सुद्धा त्याचे परिणाम होतात. भाग्य नसेल तर सोनं सुद्धा कोळश्याप्रमाणे दिसते आणि धर्मसोबत असेल तर धनासोबत प्रतिष्ठाही प्राप्त होते. त्यामुळे धन मित्र न बनता, धर्म मित्र बना! असा मोलाचा संदेश आरंभी परमपूज्य प. पु. भुतीप्रज्ञमुनिजी म. सा. यांनी दिला.