भाजपाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे यांचा राजीनामा
जळगाव |
जिल्हा परिषदेचे
माजी अध्यक्ष तथा समाजातील मातब्बर व्यक्तीमत्व मानले जाणारे दिलीप खोडपे यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ते आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश घेणार असून जामनेर विधानसभा मतदार संघातून उभे राहून ते ६ वेळा आमदार झालेले भाजपचे दिग्गज नेते गिरीश महाजन यांना आव्हान देण्याचे चर्चा जोर धरत आहे . जामनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मराठा आणि बंजारा समाज त्यांच्या पाठीमागे उभा राहण्याची तयारीत आहेत.
दिलीप खोडपे यांनी सततची हेटाळणी, अपमानास्पद वागणुक, डावलने, मूळ विचार व ध्येयधोरणांपासून जामनेर तालुक्यात स्वतःच्या डोळ्यासमोर दूर जात असलेला पक्ष याला कंटाळून, माझा स्वाभिमान जपण्यासाठी मी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच सर्व पदांचा राजीनामा दिल्याचं जामनेर भाजपा तालुकाध्यक्ष यांना दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे.