महाज्योती’चा निकाल जाहीर प्रशिक्षण संस्था निवडण्याची प्रक्रियेत बदल
मुंबई|
महाज्योतीकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC), संघ लोकसेवा आयोग (UPSC), महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गट व व क, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, स्टाफ सिलेक्शन कमिशन, आय.बी.पी.एस. बँकींग परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2024- 25 करीता घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आला आहे. याचे परिपत्रक महाज्योतीच्या वेबसाईटवर आले आहे. निकालाची यादी महाज्योतीच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिली आहे.
2024-25 या आर्थिक वर्षात महाज्योती, मार्फत राबविण्यात येणान्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC), संघ लोकसेवा आयोग (UPSC), महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गढ़ व व क. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, स्टाफ सिलेक्शन कमिशन, आय. बी. पी. एस. बँकींग परीक्षा पूर्व प्रशिक्षणांकरीता विद्याथ्यांची निवड करण्याकरीता चाळणी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात घेण्यात आल्या होत्या. त्याचा निकाल (२५ सप्टेंबर) रोजी लावण्यात आला आहे. ही प्रारूप यादी आहे. यावर विद्यार्थ्या आक्षेप नोंदवू शकतात. आक्षेपांच्या निराकरणांना अंतिम निकाल लावण्यात येणार आहे.
या परीक्षांच्या प्रशिक्षणांकरीता प्रशिक्षण संस्था निवडण्याची प्रक्रिया ही स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अंमलबजावणी व संनियंत्रण समिती मार्फत करण्यात येत आहे. परंतु महाज्योतीच्या संचालक मंडळाकडे या समितीच्या कामकाजाबाबत विविध तक्रारी आल्या होत्या. याची दखल घेऊन या प्रक्रियेमधून आहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे निवड झालेल्या विद्याध्यर्थना प्रशिक्षण देण्याची कार्यवाही करण्यासाठी शासनाकडे मार्गदर्शन मागविण्यात आलेले आहे. त्याबद्दलचे मार्गदर्शन प्राप्त झाल्यावर प्रशिक्षणाबाबत कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती महाज्योतीकडून देण्यात आली आहे.