अहिंसा सद्भावना यात्रेला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव : गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे
महात्मा गांधी जयंती तसेच लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या औचित्याने बुधवारी लाल बहादूर शास्त्री टॉवरपासून अहिंसा सद्भावना शांती यात्रा काढण्यात आली.
गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू व गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक डॉ. सुदर्शन अय्यंगार, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखविली.
खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, अनिल जैन, पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, डॉ. भरत अमळकर, ज्योती जैन, डॉ. गीता धरमपाल आदी उपस्थित होते.
अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, डॉ. शेखर रायसोनी, राजेंद्र मयूर, अनिष शहा, शिरीष बर्वे, माजी नगरसेवक अमर जैन, डॉ. राजेश पाटील, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अविनाश गांगुर्डे, सहायक
आयुक्त उदय पाटील, एजाज मलिक, दीपक सूर्यवंशी, विष्णू भंगाळे, शिवराम् पाटील, प्रवीण पगारीया, शोभना जैन, निशा जैन, डॉ. भावना जैन आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अहिंसेची प्रतिज्ञा दिली. गिरीश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. यात्रेत विविध शाळांसह जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक व खेळाडू यांच्यासह विदेशी विद्यार्थीही सहभागी होते. बैलगाडीवर चरखा सूतकताई है आकर्षण ठरले होते.