आद्य कवी श्री महर्षी वाल्मिक समिती तर्फे आयोजित भव्य रक्तदान शिबिर
मानवी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान - माजी आमदार चंद्रकांत सोनवणे
जळगांव |
आद्य कवी श्री महर्षी वाल्मिकी जयंती समिती आणि रेडप्लस ब्लड सेंटर यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.
या रक्तदान शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत रक्तदान केले. प्रसंगी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे नागरिकांना संबोधित करत “मानवी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान” आहे. आपल्या शरीरातील थोड्याशा रक्ताचे दान केल्यामुळे एखाद्याचे प्राण वाचत असेल तर यासारखे मोठे सामाजिक कार्य नाही.यांनी सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले तसेच उत्सव समिती असे सामाजिक अभिनव उपक्रम कार्यक्रम राबवावे अशी अपेक्षा चंद्रकांत सोनवणे यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी मा. आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, माजी नगरसेवक नाना सोनवणे, मनोज सोनवणे, विनोद सोनवणे, भगवान सोनवणे, किशोर सोनवणे, प्रताप कोळी, पंकज सपकाळे, नरेंद्र तायडे, भगवान तायडे तसेच मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रतिष्ठित मंडळी, युवक बहुसंख्येने उपस्थित होते.