अॅड. सुशील अत्रे यांच्या घरावर दगडफेक
जिल्हापेठ पोलिसांनी १० ते १२ जणांना घेतले ताब्यात
जळगांव |
शहरातील प्रताप नगर येथील धार्मिक स्थळाचे अतिक्रमण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काढण्याच्या कारणावरून शुक्रवारी १८ ऑक्टोबर ररात्री ११ वाजता अॅड. सुशील अत्रे यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी १० ते १२ जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्र उशिरा जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
जळगाव शहरातील प्रताप नगर परिसरात असलेल्या एका धार्मिक स्थळाचे अतिक्रमण असण्याच्या कारणावरून गेल्या अनेक वर्षांपासून तक्रार आहे. सदर अतिक्रमण काढण्याचे आदेश देण्यात आल्याने ते काढण्याची प्रक्रिया सुरू होती. यामुळे काहीजण संतप्त झाले. त्यामुळे शुक्रवारी १८ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास मोठा जमाव प्रताप नगर परिसरातील धार्मिक स्थळाच्या ठिकाणी जमला आणि अतिक्रमण काढण्यास विरोध दर्शविण्यात आला. त्यानंतर जमावाने धार्मिक स्थळापासून जवळच असलेल्या अॅड. सुशील अत्रे यांच्या घरावर दगडफेक केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पेठ पोलीस घटनास्थळी पोहोचले. तेथून १० ते १२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत नोंद घेण्याचे काम सुरू होते.
अॅड. सुशील अत्रे यांच्या घरावर दगडफेक करीत असताना जमावाने जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे प्रचंड गोंधळ उडाला.