भाजपाची पहिली यादी जाहीर
जळगांव |
भाजपच्या यादीत आज जामनेरातून ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन, जळगाव शहरातून विद्यमान आमदार राजूमामा भोळे, भुसावळमधून आमदार संजय सावकारे, चाळीसगावातुन आमदार मंगेश चव्हाण, रावेर-यावलमधून पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल हरीभाऊ जावळे यांचा समावेश आहे.
भारतीय जनता पार्टीने जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार सुरेश भोळे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ही घोषणा केली असून, स्थानिक पातळीवर याबाबत उत्सुकता वाढली आहे.
या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीसमोर शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा आव्हान असणार आहे. विरोधकांनी स्थानिक मुद्द्यांवरून सरकारवर टीका करत भाजपला घेरण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे, जळगाव शहरातील निवडणूक रंगतदार होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारतीय जनता पक्षाची उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार याबाबत मोठ्या उत्सुकतेचे वातावरण लागून होते. भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून यामध्ये ९९ मतदारसंघांचा समावेश आहे. यात जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहर, जामनेर, चाळीसगाव, रावेर, भुसावळ अशा पाच मतदारसंघांचा समावेश आहे.
भारतीय जनता पक्षाने कोणतीही रिस्क न घेता विद्यमान आमदारांसह अपेक्षित नावांनाच प्राधान्य दिले असे सदर यादीतून स्पष्ट दिसून येत आहे. निवडणुकीचे नोटिफिकेशन निघण्याआधीच भाजपचे उमेदवारांची नावे जाहीर केल्याची बाब देखील लक्षणीय मानली जात आहे.
जळगाव शहरातील मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र यंदा विरोधकांनीही चांगली तयारी केली आहे. त्यामुळे कोणता पक्ष निवडणुकीत बाजी मारणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.