राजकारणजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र
२८ ऑक्टोबर रोजी अमोल जावळे भरतील उमेदवारी अर्ज
रावेर |
रावेर मतदारसंघासाठी भाजपाने अमोल हरिभाऊ जावळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे, ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सोमवारी, दिनांक २८ ऑक्टोबर रोजी, अमोल जावळे हजारो कार्यकर्ते आणि नेत्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.
यावेळी अमोल जावळे कार्यकर्त्यांसह ढोल-ताशांच्या गजरात शक्तीप्रदर्शन करणार आहेत. या रॅलीत मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील तसेच महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होतील.
रावेर येथील पारचा गणपती मंदिरापासून सकाळी १० वाजता रॅलीला सुरुवात होईल. रावेर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा रावेर तर्फे करण्यात आले आहे.