जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारण
भाजप माजी नगरसेवक मयूर कापसेंची उमेदवारी दाखल
जळगांव |
राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. अनेक उमेदवारांनी अर्ज देखील दाखल केले असून आज जळगाव शहर विधानसभा मतदार संघासाठी भाजपचे माजी नगरसेवक मयूर कापसे यांनी देखील उमेदवारी दाखल केल्याने मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.
त्यांची अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे त्यामुळे जळगाव शहर भाजपला धक्का देखील बसला आहे.
जळगाव शहर विधानसभा मतदार संघासाठी भाजपचे माजी नगरसेवक मयूर कापसे यांनी आज दि.२९ रोजी दुपारी तहसील कार्यालयात आपली अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मोठी खळबळ उडाली होती. मयूर कापसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भाजपच्या पदांचा राजीनामा दिल्यानंतर अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेतला.