ताज्या बातम्या

लता सोनवणे आणि माजी आ. प्रा. चंद्रकांत सानवर्ण यांच्या पाठपुराव्यामुळे चोपडा तालुक्यात पिक विमा मंजूर.

चोपडा |
आमदार लता सोनवणे व माजी आमदर . प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या पाठपुराव्यामुळे ३१५२६ शेतकऱ्यांना ५१ कोटी २१ लाख इतका पंतप्रधान खरीप पिक विमा चोपडा मंजूर झालेला आहे. चोपडा तालुक्यातील सातही महसूल मंडळातील कापूस पिकासाठी एकूण ३१५२६ शेतकऱ्यांनी एक रुपयात पिक विमा काढलेला होता सदर शेतकऱ्यांसाठी सन २०२३-२०२४ मध्ये मा. आमदार लतासोनवणे आणि माजी आ.प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांमुळे दुष्काळ सदृश परिस्थिती तालुक्यांत जाहीर झाली होती त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले
होत या झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी म्हणून सतत पाठपुरावा आमदार लता सोनवणे यांनी करुन त्याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल शासनास सादर करण्यासाठी तहसीलदार भाऊसाहेब थोरात, तालुका कृषी अधिकारी दिपक साळुंखे गटविकास अधिकारी आर.ओ. वाघ यांना सुचना केल्या होत्या. यामुळे संपूर्ण तालुक्यातील
सातही मडळांमधील ३१५२६ शेतकऱ्यांना ५१ कोटी २१ लक्ष एवढा पिक विमा मंजुर झाला असून शासनाकडील हिस्सा कंपनीकडे जमा झाल्यानंतर काही दिवसांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे विम्याचे पैसे जमा होतील. याप्रसंगी आमदार लताताई सोनवणे यांनी तालुक्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणेचे कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button