स्वामी विवेकानंद महाविद्यालयात कला मंडळाचे उद्घाटन
जळगाव |
मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात कला मंडळाचे उद्घाटन कवी, गीतकार प्रा. रत्नाकर कोळी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मू. जे. महाविद्यालयाचे प्रा. डॉ. भूपेंद्र केसूर हे अध्यक्षस्थानी होते. गीतकार प्रा. रत्नाकर कोळी यांनी स्वतः लिहिलेली आणि संगीतबद्ध केलेली विविध गीत गाऊन कार्यक्रमात रंगत आणली. त्यांच्या मराठी आणि अहिराणी या खान्देशची ओळख असलेल्या बोली भाषेतील ठसकेबाज गीतांनी सभागृह मंत्रमुग्ध झाले. व्यासपीठावर स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक
प्रा. आर. बी. ठाकरे, विज्ञान शाखा समन्वयक प्रा. स्वाती बन्हाटे, कला व वाणिज्य शाखा समन्वयक प्रा. उमेश पाटील उपस्थित होते. कला मंडळाचे अध्यक्ष प्रा. दीपक चौधरी यांनी प्रास्ताविक केले तर प्रा. योगेश धनगर यांनी सूत्रसंचालन केले.प्रा. केसूर आदीनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कला मंडळ सदस्य प्रा. संध्या महाजन, प्रा. सुरेखा पाटोळे, प्रा. ईशा बडोदकर, प्रा. नीलिमा खडके, प्रा. किरण कोळी, प्रा. मपुरी हरीमकर, प्रा. विजय भोई, प्रा. जयंत इंगळे, प्रा. सूर्यकांत बोईनवाड यांनी परिश्रम घेतले.