राजकारणजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र
महायुतीचे उमेदवार आ. गुलाबराव पाटील विजयी
गुलाबराव पाटील यांना २६ व्या फेरीअखेर १ लाख ४३ हजार ४०८
जळगाव |
ग्रामीण जळगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत झुंजार लढतीमध्ये महायुतीचे उमेदवार आ. गुलाबराव पाटील यांनी विजय मिळवला असून महाविकास आघाडीचे गुलाबराव देवकर यांचा ५९ हजार २३२ मतांनी पराभव केला आहे.
आता सर्व २६ फेऱ्या संपलेल्या आहे. गुलाबराव पाटील यांना २६ व्या फेरीअखेर १ लाख ४३ हजार ४०८ तर गुलाबराव देवकर यांना ८४ हजार १७६ मते मिळाली आहे.
तिसऱ्या स्थानी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार मुकुंद रोटे यांनी १ हजार ६१९ मते मिळवून तिसरे तर वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण जगन सपकाळे यांना १४३५ मते मिळून चौथे स्थान पटकावले. धरणगाव तालुका आणि जळगाव ग्रामीण भागात विविध गावागावांत महायुतीकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे.