जळगावताज्या बातम्या
खूपचंद सागरमल विद्यालयात पर्यावरण विषयी जनजागृती करण्यात आली.
जळगाव |
खूपचंद सागरमल विद्यालय,छत्रपती शिवाजीनगर,जळगाव येथे आज पर्यावरण विषयी जनजागृती करण्यात आली. “झाडे लावा झाडे जगवा” आणि “पाणी आडवा पाणी जिरवा” अशा घोषणा देत शाळेने एक प्रचार फेरी काढली होती त्यात मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थीत होते होते. जगात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे,वृक्षतोड रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे याविषयी सविस्तर माहिती विद्यार्थींना देण्यात आली.
याप्रसंगी मुख्याध्यापिका योगिनी बेंडाळे,लक्ष्मीकांत महाजन, प्रवीण पाटील,राजेश इंगळे,विजय पवार,सुनील साळवे,कल्पना देवरे करुणा महाले व धर्मरथ फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष विनायक पाटील यांची उपस्थिती लाभली.