वाघ नगर परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन
नागरिकांचा उत्सफूर्त प्रतिसाद
जळगांव |
वाघ नगर परिसरात दत्त जयंती दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे रक्तदान शिबिर श्री समर्थ रिक्षा स्टॉप आणि रेडप्लस ब्लड सेंटर
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले होते. शिबिरात 20 दात्यांनी रक्तदान करून शिबिर यशस्वी केले. दरवर्षी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने अशा रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्त पिशव्यांचे संकलन होऊन ते गरजू रुग्णांना माफक दरात उपलब्ध होते.
आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त सहभाग घेतला. या प्रसंगी मार्गदर्शन करताना सुभाषचंद्र रिक्षा युनियचे प्रल्हाद सोनवणे
म्हणाले की, अजूनही आपल्याला कृत्रिम रक्त तयार करता आलेले नाही. त्यामुळेच मानवी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपल्या शरीरातील थोड्याशा रक्ताचे दान केल्यामुळे एखाद्याचे प्राण वाचत असेल तर यासारखे मोठे सामाजिक कार्य नाही. शिवाय रक्तदानामध्ये गेलेल्या रक्ताची शरीरात पुन्हा काही तासातच निर्मिती होऊन आवश्यक ती पातळी राखली जाते.
रक्तदानामुळे रक्तदात्याला कोणताही धोका नाही.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी
योगेश बागडे,अजय वाघ दीपक धनगर,आबा दादा,निलेश अहिरे,दिगंबर नेवे,राहुल पाटील,सरफराज तडवी,भैया सपकाळे,राजू बडगुजर,साहेबराव चौधरी, युवराज भोई , जयवंत बोदडे, जगदीश सुरवाडे, बंटी सोनार ,अजय चौधरी , योगेश पसारे ,सुभाष चव्हाण ,अमीर तडवी,राजू पेंटर, रवि चौधरी,वाणी बाबा,बोरोले इत्यादी उपस्थीत होते.
याप्रसंगी
नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.