सिद्धिविनायक क्रीडा मंडळाच्या खेळाडूंचे महाराष्ट्र संघात निवड

जळगांव |
जळगाव जिल्हा आट्यापाट्या संघटना
व सिद्धिविनायक क्रीडा मंडळाचे खेळाडू * स्वप्निल महाजन, रोहित नवले, देवेश पाटील, वैष्णवी पाटील* या खेळाडूंची ३७ वी पुरुष व ३३महिला गट राष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झालेली आहे.
त्यांच्या या निवडीनिमित्त जळगाव जिल्हा आट्यापाट्या संघटनेचे अध्यक्ष आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, चोपडा मतदार संघाच्या माजी आमदार लता चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जळगाव जिल्हा आट्यापाट्या संघटनेचे सचिव डॉ प्रदीप तळवेलकर चोपड्याचे माजी उपनगराध्यक्ष श्री विकास पाटील, सिद्धिविनायक फाउंडेशनच्या संचालिका डॉ. अमृता सोनवणे डॉ. गौरव दादा सोनवणे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त विजय न्हावी विशाल फिरके अँड. अक्षय टेमकर हे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विजयी खेळाडूंना राज्यसंघातील निवडीसाठी अभिनंदन व कौतुक करून राष्ट्रीय स्पर्धेतील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सिद्धिविनायक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक व सह सचिव अनिल माकडे सर यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले आहे. राष्ट्रीय स्पर्धा दिनांक ३ ते ५ जानेवारी २०२५ या कालावधीत शेगाव जिल्हा बुलढाणा येथे होणार आहे.