12वीच्या परीक्षेला उरला 1 महिना, आजपासून हॉल तिकीट देण्यास सुरुवात
मुंबई|
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बारावीची परीक्षा फेब्रुवारी महिन्यात सुरु होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासाला लागले आहेत. दरम्यान, बारावीच्या विद्यार्थ्यांना आजपासून परीक्षेचे हॉल तिकीट देण्यात येणार आहे.
बारावीच्या परीक्षेला फक्त १ महिना बाकी आहे. जानेवारी महिन्यात त्यांची तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने दहावी- बारावीच्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. वेळापत्रकानुसार फेब्रुवारी-मार्चमध्ये बारावीची परीक्षा होणार आहे. त्या परीक्षेचे हॉल तिकीट आजपासून दिले जाणार आहे.
सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना ही प्रवेशपत्रे ऑनलाइन पद्धतीने डाउनलोड करता येणार आहे. तुम्ही ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावरुन आजपासून ॲडमिट कार्ड लिंकद्वारे डाउनलोड करता येणार आहे.
बारावी हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष असते. आता बारावीच्या परीक्षेला फक्त १ महिला उरला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचे टेन्शन वाढले आहे. बारावीची तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा ही जानेवारी महिन्यातच होणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांचा पूर्ण वेळ हा अभ्यासात जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आतापासूनच सराव करायला सुरुवात केली पाहिजे.
बारावीची परीक्षा ही ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या दरम्यान होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करायला हवा. बारावीच्या निकालानंतरच विद्यार्थ्यांना पुढे पदव्युतर शिक्षणासाठी संधी उपलब्ध होतात. त्यामुळे चांगले गुण मिळाल्यास चांगल्या कॉलेजलादेखील अँडमिशन मिळेल.