नेचर कॅफे आणि पँथर स्पोर्ट्स क्लब तर्फे १५ दिवसीय मोफत झुंबा, बांबू वर्कआउट, योगा शिबिराचे आयोजन

जळगाव |
नेचर कॅफे आणि पँथर स्पोर्ट्स क्लब तर्फे १५ दिवसीय मोफत झुंबा, बांबू वर्कआउट, योगा शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
आजच्या काळात माणसांची जीवनशैली इतकी धकाधकीची झालेली असून, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही. त्यामुळे मधुमेह, हृदयविकारासारखे अनेक समस्या उद्भवू लागल्या आहेत. परंतु आपल्या जीवनशैलीत थोडा बदल करून प्रत्येकाने व्यायामासाठी एक तास दिला तर कुठलेही औषध न घेता या आजारापासून आपण दूर राहू शकतो.
करिता जळगाव येथील नेचर कॅफे आणि पँथर स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने १५ दिवसीय झुंबा, बांबू वर्कआउट, योगा शिबिराचे महिला आणि पुरुषांसाठी एकत्रित आयोजन करण्यात आलेले आहे. सदरचे
शिबिर खाँजामिया जवळील कन्या शाळा समोरील महावीर क्लासच्या शेजारी असलेल्या नेचर कॅफेच्या सुसज्ज हॉलमध्ये दिनांक १७ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान रोज सकाळी सात ते आठच्या दरम्यान होणार असून. शिबिरामध्ये झुंबा, एरोबिक, बांबू वर्कआउट, योगा, स्टमक वर्कआउट आदींसह व्यायामाच्या विविध प्रकारचे तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण दिले जाणार आहे.
सदरचे शिबिर पूर्णपणे विनामूल्य असून ज्या महिला, पुरुषांना भाग घ्यावयाचा असेल त्यांनी महावीर क्लासच्या शेजारी नेचर कॅफे मध्ये संपर्क साधायचा आहे.
शहरातील जास्तीत जास्त महिला पुरुषांनी शिबिरामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन नॅचरल कॅफे तसेच पँथर स्पोर्ट्स क्लबच्या प्रशिक्षक माधुरी अहिरे यांनी दिलेले आहे.अधिक माहितीसाठी 9823136399 या क्रमांकावर संपर्क साधावा.