जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रसंस्था

अप्पासाहेब भालेराव प्रतिष्ठानतर्फे ‘मी सावली भीमाची’ एकपात्री प्रयोग सादर होणार

जळगाव |
भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अप्पासाहेब भालेराव प्रतिष्ठानतर्फे शरद भालेराव हे लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसाठी २५ जानेवारी रोजी निरंतर २५ तासांचा ‘मी सावली भीमाची’ हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर करणार आहेत.

शरद भालेराव लिखित आणि चिंतामण पाटील दिग्दर्शित ‘मी सावली भीमाची’ या एकपात्री नाट्यप्रयोगाद्वारे लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे. या प्रयोगातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ज्वलंत इतिहास सांगितला जाणार आहे. प्रयोगाचे
उद्घाटन ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ मालिकेतील अभिनेता हेमंत पाटील आणि प्राचार्य एल. पी. देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. या प्रयोगाच्या रेकॉर्डला नूतन मराठा महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉल येथे सकाळी ९ वाजेपासून सुरुवात होईल. प्रयोग २६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता समाप्त होईल. कार्यक्रमासाठी विलास यशवंते, पद्मनाभ देशपांडे, हरिश्चंद्र सोनवणे, दीपक जोशी आदींनी प्रयत्न केले आहे. प्रयोग सर्वांसाठी मोफत असून, रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी, असे आवाहन शरद भालेराव यांनी केले आहे. नियोजनाची तयारी वेगात सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button