संस्थाकरिअरजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिंदगी फाउंडेशन कडून शिक्षकांना पुरस्कार वितरित

नामदेव पाटील आणि सुभाष पाटील यांना पहिला "साऊज्योती आवडते शिक्षक" पुरस्कार प्रदान

पाचोरा |
जिंदगी फाउंडेशन या संस्थेकडून यावर्षी शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या आणि आपले वेगळेपण जपणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. पहिलाच पुरस्कार प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी तांडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे शिक्षक नामदेव पाटील आणि सुभाष पाटील या दोघांना वितरित करण्यात आला. सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या या पुरस्काराचे नाव ‘साऊज्योती आवडते शिक्षक’ पुरस्कार असे आहे.
या दोघांना जिंदगी फाउंडेशन कडून मानचिन्ह आणि प्रत्येकी दहा हजार रोख रक्कम या स्वरूपात पुरस्कार देण्यात आला. जिंदगी फाउंडेशनच्या अध्यक्षा सुष्मिता भालेराव आणि सचिव अजय पाटील यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. नामदेव पाटील आणि सुभाष पाटील या शिक्षकांनी शाळेची पटसंख्या कमी न होऊ देता वाढवत नेली. त्यामुळेच पहिली ते चौथी असलेल्या या शाळेमध्ये आठवीपर्यंत वर्ग वाढले. या दोघे शिक्षकांनी मुलांमध्ये अभ्यासापलीकडे खेळ आणि कलेची आवड निर्माण केली. त्यामुळे या शाळेतील मुलांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व घडले. या शाळेत ऊसतोड कामगारांची मुले अधिक प्रमाणात शिकतात. या मुलांच्या पालकांची दारू सोडवण्याचे काम सुद्धा दोघे शिक्षकांनी केले. मुलांच्या शाळेतील प्रगती सोबतच त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी सुधारली. शिवाय शाळेच्या प्रांगणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वृक्षारोपण करून शाळेचा परिसर निसर्गमय केला. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी देण्यात आलेल्या या पुरस्काराच्या प्रसंगी गावकरी, शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. विशेष म्हणजे दोन्ही शिक्षकांनी त्यांना पुरस्कारामध्ये मिळालेली रक्कम शाळेच्या बांधकामासाठी देणगी स्वरुपात दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button