ताज्या बातम्या
शहरात दुर्मिळ गिधाड आढळले
जळगाव |
जागतिक स्तरावर संकटग्रस्त असलेले लांब चोचीचे गिधाड जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परिसरात आढळून आले आहे. दीड महिन्यापूर्वी सातपुड्यात हे गिधाड आढळून आले होते. विद्यापीठ कर्मचारी
अमोल सपकाळे यांना हे गिधाड आढळून आले. या गिधाडाबाबत राहूल सोनवणे, प्रसाद सोनवणे, अमन गुजर, बाळकृष्ण देवरे व रवींद्र फालक यांनी वन विभागाला कळविले. लांब चोचीचे भारतीय गिधाडाचे शास्त्रीय नाव ‘जीप्स इंडिकस’ असे आहे.