जिल्हा परिषदेवर आंगणवाडी कर्मचारी संघटनेचा मोर्चा..
जळगाव |
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना जळगावतर्फे अंगणवाडी कर्मचारी महिला भगिनींना मानधनात वाढ मिळावी व त्यांच्या इतर प्रलंबित प्रश्नांबाबत जळगाव जिल्हा परिषदेवर छत्री मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी रोहिणी खडसे यांनी अंगणवाडी कर्मचारी महिला मोर्चात सहभागी होऊन त्यांच्या आंदोलनाला पाठींबा दर्शविला. त्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भरघोस मानधन वाढ मिळणे, त्यांना पेंशन योजना व ग्रॅज्युइटी, महागाई भत्ता, विमा संरक्षण लागू करणे, सेवा समाप्तीचा लाभ त्वरित मिळणे, मोबाईल रिचार्ज बिलात वाढ करणे, अंगणवाडी लाभार्थ्यांना देण्यात येणारा पोषण आहाराचा दर्जा सुधारून पोषण आहाराचे काम बचत गटांना देण्यात यावे, अंगणवाडी सेविकांना स्वेच्छा बदली मिळणे, भरपगारी आजारी रजा मिळणे व थकीत बिले लवकर अदा करणे, १० वी पास मदतनीसांना सेविकापदी बढती मिळणे व त्यांची मागील सेवा सलग धरणे अशा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या असून त्या मागणी पूर्ण व्हावीत याकरिता मोर्चा काढण्यात आला. या मागण्यांविषयी सत्ताधारी वेळोवेळी आश्वासन देऊनही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यांच्या या मागण्यांसाठी असणाऱ्या लढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत असल्याचे त्यांनी महिलांना विश्वास दिला.