जळगावात नरेडको प्रॉपर्टी एक्सपोचे उद्घाटन

जळगाव ।
नाशिक येथील नरेडकोतर्फे १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान सागर पार्क मैदान येथे प्रॉपर्टी एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे. या एक्स्पोचे शुक्रवारी युवा आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. एक्स्पोच्या उद्घाटनाप्रसंगी मंत्री रक्षा खडसे यांनी जळगावकरकगाक नाशिकला घर घेण्याचे स्वप्न या प्रदर्शनामुळे पूर्ण होणार आहे. कुंभनगरीच्या विकासाबाबत मुख्यमंत्री सक्रिय असून येत्या २ ते ३ वर्षात नाशिकचा चेहरा बदललेला असेल असेही सांगितले. आमदार सुरेश भोळे यांनी नाशिक शहर विकासात पुढे आहे. या प्रदर्शनाने नागरिकांना गृह प्रकल्पांचे असख्य पर्याय एकाच . छताखाली उपलब्ध झाले आहे असे सांगितले, नरेडकोचे अध्यक्ष सुनील गवादे यांनी प्रदर्शन आयोजनाने
प्रॉपर्टी एक्सपोच्या
नाशिकचे ब्रेण्डिंग व मार्केटिंग केले जाते. या एक्स्पोमध्ये २० लाखांपासून ते १.५ कोटी रुपये किमतीचे प्रकल्पांचे सादरीकरण असून घर, जमीन, प्लॉट, रो- बंगलो असे विविध प्रकल्प उपलब्ध आहेत. एक्सपोचे समन्वयक प्रशांत पाटील यांनी नाशिकच्या गृहप्रकल्पांचे नवीन प्रकार येथे उपलब्ध आहे. यात अधिक गृहप्रकल्पांतील घरे विक्रीसाठी
उपलब्ध आहे. प्रदर्शनात परवडणाऱ्या प्रकल्पांचा समावेश आहे.
उत्तम आणि सोयीनीयुक्त अशी लोकेशन्स, फ्लॅट्स बंग्लो, रो हाऊस, प्लॉट या सोबतच होमलोन देण्यासाठी तत्पर अशा
निशम डेव्हलपर्स यांचा प्रोजेक्ट्स सहभागी झाले आहेत.
प्रोजेक्टमध्ये २ bhk आणि ३ bhk फ्लॅट्स उपलब्ध आहेत”.
येथे विविध सोईनी युक्त असलेल्या या प्रोजेक्टला सकारात्मक प्रतिसाद या एक्सपोमुळे मिळतो आहे.
नाशिक येथे खरेदीसाठी निशम डेव्हलपर्स अधिक माहितीसाठी 84110 33615 या क्रमांकांवर संपर्क साधावा.
कार्यक्रमास नरेडकोचे अध्यक्ष सुनील गवादे, सचिव शंतनू देशपांडे, खजिनदार भूषण महाजन, प्रदर्शन समन्वयक प्रशांत पाटील, प्रसन्न सायखेडकर, अश्विन आव्हाड, शशांक देशपांडे, ज्ञानेश उपासनी, नितीन सोनावणे, अनुप भांडारकर, भूषण कापडाने, अभिषेक बिरारी, सुनील सावंत व स्टॉलधारक उपस्थित होते.