जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारण

जळगावात शिवसेना शिंदे गटा तर्फे मेळावा

जळगाव |
“राज्यात महायुतीचे सरकार जोरदार काम करीत असून पाच वर्षात मी तुमच्यासोबत प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलो. आता तुमचे ९० दिवस माझ्यासाठी द्या” असे भावनिक आवाहन गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. विधानसभा निवडणुकीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवलंबून असल्याने आगामी सर्व निवडणुकांमध्ये भगव्याचे राज्य येण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हा असे आवाहन गुलाबराव पाटील यांनी केले.
धरणगाव आणि जळगाव तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागाचा शिवसेनेचा मेळावा अजिंठा विश्राम गृह येथे पार पडला.
गावपातळीपासून ते तालुका पातळीवरील सर्व पदाधिकाऱ्यांनी संघटना वाढीसाठी कार्यरत राहावे. विकासासाठी सदैव झटणाऱ्या आणि कार्यकर्त्यांना नेहमी साथ देणाऱ्या मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सदैव पाठीशी राहून जळगाव ग्रामीण मधून मोठ्या फरकाने लीड देण्याचा संकल्प करून कामाला लागा. जळगाव ग्रामीण भागात शाखाप्रमुख, सरपंचांनी, जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणनिहाय बैठका घेऊन सुक्ष्म नियोजन करून आगामी सर्व निवडणुकांमध्ये नियोजनबद्ध पध्दतीने मिशन मोडवर राहून काम करून विजय खेचून निवडून आणा असे आवाहन शिवसेनेचे सचिव तथा उत्तर महाराष्ट्राचे संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी यांनी केले.
यावेळी पवन सोनवणे, उपजिल्हा प्रमुख अनिल भोळे, नरेंद्र सोनवणे, पी. एम. पाटील, शहर प्रमुख विलास महाजन, पप्पू भावे, युवासेनेचे तालुका प्रमुख ज्ञानेश्वर काटोले, अजय महाजन, आबा माळी, माजी सभापती नंदलाल पाटील,मुकुंद नन्नवरे, प्रेमराज पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, तालुका पदाधिकारी जितू पाटील, प्रमोद सोनवणे, संदीप सुरळकर, प्रवीण परदेशी, संजय घुगे, डॉ. कमलाकर पाटील, मार्केटचे माजी सभापती कैलास चौधरी, प्रमोद सोनवणे, राजू पाटील, साहेबराव वराडे, महेश चौधरी, गोपाल जिभाऊ पाटील, महिला आघाडीच्या पदाधिकारी शोभा चौधरी, ज्योती चव्हाण, पुष्पा पाटील, यांच्या सह तालुक्यातील सरपंच, उपसरपंच सदस्य पदाधिकारी व लोकप्रतिनिधी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button