पाचोऱ्यात जोडे मारो आंदोलन
पाचोरा |
भाजप खा.अनुराग ठाकूर संसदेसारख्या पवित्र ठिकाणी जातिवाद निर्माण करतो असे म्हणून त्याच्याविरोधात पाचोरा शहरात काँग्रेस पक्ष आक्रमक होऊन त्यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रोश व्यक्त करत ठाकुरांच्या फोटोला जोड्यांनी मारले.
संसद ही पवित्र स्थान आहे आणि त्या संसदेमध्ये जात, धर्म याला कुठल्याही थारा नाही असे असताना देखील भाजपाचे खा. अनुराग ठाकूर याने संसदेत काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी देशांमध्ये जात गणना करावी यासाठी जोरदार मागणी लावली आहे. या देशांमध्ये भाजप गेल्या अनेक दिवसापासून जे जातीवादी वातावरण तयार करत असून त्यासाठीच जातगणना ही करण्यात यावी. जेणेकरून देशांमधील सर्व जनतेला सत्य दिसेल, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.
खा. अनुराग ठाकूर सारखे लोक जातिवाद करीत आहे याच्या निषेधार्थ काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठाकूर यांच्या फोटो फाटेपर्यंत जोडे मारो आंदोलन केले. यावेळी आंदोलनात तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, शहराध्यक्ष अॅड अमजद पठाण, प्रदेश प्रतिनिधी शेख इस्माईल शेख फकीरा, जिल्हा सरचिटणीस प्रताप पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शरीफ खाटीक, जिल्हा सचिव इरफान मनियार, युवक विधानसभा अध्यक्ष प्रदीप पाटील, उपाध्यक्ष कल्पेश येवले, झानेश्वर पाटील, महिला जिल्हा सरचिटणीस संगीता नेवे, उपाध्यक्षा कुसुम पाटील, डॉक्टर सेल तालुका अध्यक्ष डॉ. मंजूर खाटीक, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष शरीफ शेख, तालुका उपाध्यक्ष सुनील पाटील, शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, पिंपळगाव प्रकाश चव्हाण, संदिप पाटील वाघुलखेडा, दिगंबर पाटील, शंकर सोनवणे, अल्ताफ खान, अजीम देशमुख, नदीम शेख, आबिद शेख जाबीर बागवान, मुस्तगिर टकारी, नईम मन्यार, रवी पावरा, सै. सय्यद युनुस मणियार, सचिन सोनवणे, आतिश सोनवणे आदी उपस्थित होते.