जळगावताज्या बातम्या

भारताच्या संविधान उद्देश पत्रिकेचे मराठी मिरर इमेज प्रकारात लेखन

जळगांव |१६ एप्रिल २०२५|खान्देश लाईव्ह न्यूज|
संविधान हा राष्ट्राचा अंतिम किंवा सर्वोच्च कायदा आहे. याच संविधानाच्या सुरुवातीला संविधानाची उद्देशिका किंवा प्रस्तावना आहे. या उद्देश पत्रिकेला भारतीय संविधानाचा आत्मा, कणा मानला जातो.आपल्या संविधानाची उद्दिष्टे आणि आकांक्षा याद्वारे स्पष्ट होतात.
याच संविधान उद्देश पत्रिकेचा मराठी मिरर इमेज प्रकारात पत्रकार हर्षल सोनार यांच्या मार्फत करण्यात आले.
मिरर इमेज लेखन प्रकारात अक्षारांची मांडणी सुल्टि करावी लागते की जेणकरुन लेखन आरशात पाहिल्यावर लिखाण आपल्याला लिहिलेला मसुदा हा वाचता येतो. मिरर इमेज प्रकारात लिहिण्या मागचं कारण संविधानाच्या उलट भूमिका घेणाऱ्या लोकांनाही संविधानाचा गाभा आणि महात्म्य समजावे याकरिता संविधानाची उद्देश पत्रिका मराठी मिरर इमेज प्रकारात मांडण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button