राजकारणजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातपुडा जंगल सफारीच्या बुकिंग वेबसाईटचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

जळगाव ,दि. ३ मे२०२५|खान्देश लाईव्ह न्यूज|
जिल्हा नियोजन समिती, जळगाव यांच्या २०२४/२५ च्या वार्षिक योजनेअंतर्गत सातपुडा जंगल सफारी पाल योजनेच्या बुकिंग वेबसाईटचे उद्घाटन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मा. ना. श्री. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

सदर कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा वार्षिक नियोजनच्या प्रशासकीय आढावा बैठकीपूर्वी पार पडला. या वेळी खासदार श्रीमती स्मिता वाघ, आमदार श्री. राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल, उपवनसंरक्षक (वन्यजीव) श्री. जमीर शेख, उपवनसंरक्षक (जळगाव विभाग) श्री. प्रवीण ए. व अन्य मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सातपुडा जंगल सफारीच्या माध्यमातून होणाऱ्या पर्यटनवाढीबाबत आणि ऑनलाईन बुकिंग प्रणालीद्वारे पर्यटकांना मिळणाऱ्या सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. जिल्हा नियोजनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या अशा उपक्रमांमुळे जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रास निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button