विद्यापीठात उद्योजकांसोबत संवाद

जळगाव |खान्देश लाईव्ह न्यूज|
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे १५ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसवर जळगाव, धुळे, नंदुरबार या तीन जिल्ह्यातील उद्योजक प्रतिनिधींसमवेत शैक्षणिक संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी हे असतील. उद्योजकांसाठी तयार केलेला ४ वर्षांचा अॅप्रेंटिस एम्बडेड पदवी अभ्यासक्रम, उद्योगांमध्ये १ वर्षासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची संधी तसेच ३ ते ६ महिन्यांचे कौशल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम यावर या बैठकीत चर्चा होणार असून, उद्योजकांच्या सूचना
चर्चेत हे होणार सहभागी
संवादासाठी प्लास्टिक पीव्हीसी, कृषी, अन्नप्रक्रिया, इलेक्ट्रिकल, ऑटो, फार्मा, केमिकल्स आणि सेवा क्षेत्रातील उद्योजक प्रतिनिधींना विद्यापीठाने निमंत्रित केले आहे, अशी माहिती नवोपक्रम, नवसंशोधन व सहचर्य मंडळाचे संचालक डॉ. राजेश जवळेकर यांनी दिली.
ऐकल्या जातील. विद्यापीठाच्या करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती उद्योजकांना दिली जाईल. या चर्चेतून धोरणात्मक रोड़ मॅप तयार करण्यास दिशा मिळेल, अशी अपेक्षा करण्यात आली आहे. त्यामुळे हा संवाद खूपच फलदायी ठरणार आहे. त्यामुळे उद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.